Nashik News: पारंपारिक पिकाला फाटा देत शेतकरी वळला 'जिरेनियम' शेतीकडे, कमी खर्चात अधिकच उत्पन्न
नाशिकच्य नांदगाव तालुक्यातील 'पांझनदेव' येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग करत कमी उत्पादन खर्च हमखास उत्पन्न मिळवायला सुरुवात केली
नाशिक : निसर्गाचा लहरीपणा तसेच अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीतून शेतकरी वाचला तर शेतीपिकाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता 'जिरेनियम'शेतीने दिलासा दिला आहे. नाशिकच्या (Nashik News) नांदगाव तालुक्यातील 'पांझनदेव' येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग करत कमी उत्पादन खर्च हमखास उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पांझनदेव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सखाराम पाटील यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत आपल्या चार एकर क्षेत्रात जिरेनियम वनस्पतीची लागवड केली आहे. हिरव्या रंगाच्या असलेल्या या वनस्पतीच्या पाल्यापासून सुगंधित तेलाची निर्मिती होते. या तेलाला भारतात नव्हे तर जगभरात मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने तयार करणार्या कंपन्यांसह दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू तसेच औषधी निर्माण कंपन्यांकडून हे तेल खरेदी केले जाते.
महिन्याला तीन ते चार लाख रुपये हमखास उत्पन्न
एक एकरात साधारण 10 टन पाला निघतो त्यातून 9 ते 10 किलो तेल मिळते आणि 1 किलो तेलाला 10 ते 12 हजार रुपयापर्यंत दर त्यांना मिळतो. या जिरेनीयम शेतीतून दर तीन महिन्याला तीन ते चार लाख रुपये हमखास उत्पन्न मिळतं असं ते सांगतात. त्यांनी 6 लाख रुपयांचा प्रक्रिया प्रकल्पही सुरु केलाय. आतापर्यंत 200 किलो तेल त्यांनी विकलंय. सहा महिन्यातच युनिटचे पैसे वसूल झाल्याचं ते सांगतात.
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती
या जिरेनियम शेती उत्पादन घेण्याचा फायदा असा आहे की या उत्पादनावर करपा, मावा यासह इतर रोग येत नाही.त्यामुळे पिकावर महागडी औषधांची फवारणी करण्याची गरज नाही.जनावरे देखील खात नाही, अतिवृष्टी व गारपीटचा या पिकावर परिणाम होत नाही..शिवाय एकदा लागवड केल्या नंतर सलग चार वर्षे या पिकातून उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती म्हणजे जिरेनियम शेती असल्याचे शेतकरी बाळासाहेब पाटील सांगतात.त्यांना या जिरेनीयम शेतीतून दर तीन महिन्याला तीन ते चार लाख रुपये हमखास असे उत्पन्न मिळते..
महिलांची सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये जिरेनियमचा वापर होत असल्याने बाजारात त्याची चांगली मागणी असते. भारतात जिरेनियमची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी ही शेती केल्यास त्यांना निश्चित बाजार उपलब्ध होईल असं हे शेतकरी सांगतात.
हे ही वाचा :