एक्स्प्लोर

Mango farmers : बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका, आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत; लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात 

Mango farmers : बदलत्या वातावरणाचा (Climate change) हापूस आंब्यावर परिणाम होत आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Climate change : बदलत्या वातावरणाचा (Climate change) शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊसही पडत आहे. याचा परिणाम हापूस आंब्यावर (Alphonso Mango) होत आहे. त्यामुळं रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी (Mango farmers) चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणामुळं आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळं लाखो हेक्टरवरील आंब्याचे पीक धोक्यात आले आहे. 

फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत

वातावरणातील बदलामुळं कोकणातला हापूस आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण पीकावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी आणि अवकाळी पाऊस यामुळं हापूस आंब्याची फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी लाखो हेक्टरवर असलेली आंबा पीकाची शेती धोक्यात आली आहे. या साऱ्याचा परिणाम आर्थिक उलाढालींवर देखील होताना दिसत आहे.

आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

कोकणात पडणारा अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ  झाली आहे. त्यामुळं फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

परतीच्या पावसाचा आंब्याच्या हंगामावर परिणाम

फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी वाशी बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परतीच्या पावसामुळं झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळं आंब्याची पहिली पेटी जरी वाशी बाजार समितीमध्ये दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे. आंबा पिकाबरोबरच कापूस, सोयाबीन या पिकांना देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. तर या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर या मालाला बाजारपेठेत योग्य तो दरही मिळताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Hapus News : बदलत्या वातावरणाचा 'हापूस' ला फटका, किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं हंगामाला उशीर होणार, शेतकरी चिंतेत 

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget