Agriculture News : वटवाघळांपासून द्राक्ष वाचवण्यासाठी सांगलीतल्या शेतकऱ्यांचा देशी जुगाड, बागांवर अंथरली मासे पकडण्याची जाळी
Sangli Agriculture News : वटवाघळांपासून द्राक्ष पिकाचं संरक्षण (Grape crop protection) करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशी जुगाड केलं आहे.
Sangli Agriculture News : राज्यात सांगली (sangli) जिल्ह्याला द्राक्ष पंढरी (Grapes) म्हणून ओळखलं जातं. कारण या जिल्ह्यात हजारो एकर शेती द्राक्ष लागवडीखाली आहे. मात्र, दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (Grape Farmers) विविध संकटाचा सामना करावा लागतो. या संकटावर मात करुन शेतकरी विविध शक्कल लढवत असतात. वटवाघळांपासून द्राक्ष पिकाचं संरक्षण (Grape crop protection) करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशी जुगाड केलं आहे. द्राक्ष बागांवर चक्क मासे पकडण्याची जाळीच अंथरली आहे.
द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या हल्ल्याचं नवं संकट
अवकाळी पाऊस, धुके, वेगवेगळ्या बुरशी अशा अनेक आव्हानांना तोंड देऊन सांगली (Sangli) जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या कष्टाने लाखो रुपयांची कमाई करतात. या माध्यमातून देशाला परकीय चलन मिळवून देत आहेत. पण या शेतकऱ्यांना रोज एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आता द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या हल्ल्याचे एक नवीनच संकट घोंघावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी देशी जुगाड केलं आहे. शेतकऱ्यांनी वटवाघळांच्या हल्ल्यांपासून बागांचे संरक्षण करण्यासाठी एक शानदार उपाय शोधून काढला आहे. त्यांनी चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात, ती जाळी द्राक्ष बागांवर अंथरली आहे. त्यामुळं वटवाघळांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे.
द्राक्ष बागांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाड
वटवाघळे द्राक्ष बागेवर रात्रीची हल्ले करतात. आपल्या टोकदार चोचीने द्राक्षाचे मणी फोडतात. सकाळी पाहिले तर बागेत द्राक्षांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून येतो. यामुळं शेतकऱ्यांचं लाखों रुपयांचं नुकसान होते. पण आता ही जाळी अंथरल्यानं वटवाघळे द्राक्षांच्या मन्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळं वटवाघळांच्या हल्ल्यापासून द्राक्ष बागांचे नुकसान टाळत येत आहे. यापूर्वी शेतकरी मोठे मोठ्या पॉवरचे लाईट लावून वटवाघळांच्या हल्ल्यावर उपाय करत होते. पण हे अत्यंत खर्चिक असल्यानं सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. फटाके लावून वटवाघळांना हुसकावून लावणे प्रॅक्टिकली शक्य नसल्यानं शेतकऱ्यांनी आता ही माशांची जाळी लावण्याचा जुगाड केला आहे. हाजुगाड अंमलात आणून शेतकऱ्यांनी वटवाघळांच्या हल्ल्यापासून बागांचे संरक्षण केलं आहे. माशांच्या जाळीचा वापर शेतकऱ्यांना फायदेसीर ठरत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान वाचत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: