एक्स्प्लोर

Sharad Pawar : कारखान्यांनी इथेनॉलसह CNG, हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला

Sharad Pawar : साखर कारखान्यांनी इथेनॉलसह सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखानदारांना दिला.

Sharad Pawar : भविष्यात साखर कारखान्यांना (Sugar factory) सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरिक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावं लागणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. सध्या देशात साखरेचं (Sugar) मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादित केली जात आहे. त्यामुळे साखरेला किफायतीश दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतो असेही पवार म्हणाले. कारखान्यांनी सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला शरद पवारांनी साखर कारखानदारांना दिला.

ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या जातीचं बियाणं वापरावं 

अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे करावा असेही शरद पवार म्हणाले. ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) इथे बोलत होते. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 46 वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. ऊसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर चांगल्या जातीच्या बेण्याचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी साखर कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. 

यंदाचा ऊस गाळप हंगाम विक्रमी होणार 

साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रमाणेच सीएनजी आणि हायड्रोजन वापराकडे लक्ष द्यायला हवं. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीची वाहनं अधिक मायलेज देतात. त्यामुळे सीएनजी हे प्रभावी इंधन ठरत आहे. म्हणून साखर कारखान्यांनी याचा विचार करायला हवा असे शरद पवार म्हणाले. यंदाचा गळीत हंगाम 191 दश लक्ष टन होईल असा अंदाज असल्याचे पवार म्हणाले. हा जागतिक उच्चांक होणार आहे. मागील वर्षी 185 दशलक्ष टन ऊसाचं गाळप झाल्याचे शरद पवार म्हणाले. मागील वर्षी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन केलं आहे. महाराष्ट्रने साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे शरद पवार म्हणाले.

राज्यातील सगळ्या भागात ऊसासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी VSI ची केंद्र उभारणार

राज्यातील सगळ्या भागात ऊसाचं उत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्र उभं करण्यात येणार असल्याचे शरद पवार म्हणाले. सध्या जालना जिल्ह्यात एक केंद्र झाले आहे. लवकरच नागपूर आणि अमरावतीत देखील VSI केंद्र उभारणार असल्याचे पवार म्हणाले. तसेच पुढच्या काळात खानदेशात देखील VSI चे केंद्र उभारण्याचा उद्देश असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pune News : शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर, 'या' कार्यक्रमासाठी येणार एकत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget