(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra: महाराष्ट्रात कांदा पीक विमा घोटाळा? कृषी विभागाने सादर केली आकडेवारी, या 8 जिल्ह्यांत क्षेत्राच्या तुलनेत काढला एवढा पीकविमा
Onion Insurance Scam: कांदा पिकातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमा का उतरवला गेला काय आहे त्याची काय कारण आहेत? इतर खरीप पिकाच्या तुलनेत कांदा पिकासाठी विमा संरक्षणाची रक्कम ही सर्वात जास्त असल्याचं सांगण्यात आलंय.
Maharashtra: राज्यात मागील वर्षीपासून सलग कांद्याच्या दरांवरून शेतकऱ्यांची नाराजी असताना राज्यातील ८ जिल्ह्यांत कांदा पीक विम्यात मोठा घोटाळा झाल्याचा खुद्द कृषी आयुक्तालयाचा संशय आहे. कारण महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रापेक्षा तब्बल ३३९ टक्के अधिक विमा उतरवल्याचं कृषी आयुक्तालयानं एका पत्राद्वारे म्हटलंय. त्यामुळे त्यांनी आठही जिल्ह्याच्या कृषी संचालकांना कडक तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कांद्याच्या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 46000 ते 81000 असल्याने मोठ्या प्रमाणावर लागवडीपेक्षा विमा जास्त उतरवल्याचं समोर आलं आहे. तपासणी दरम्यान आठ जिल्ह्यांचं लागवड क्षेत्र हे 75 हजार 312 हेक्टर असताना विमा काढलेला क्षेत्र हे दोन लाख 63 हजार 136 हेक्टर एवढा आहे. याचाच अर्थ कांदा पिकाची प्रत्यक्ष लागवड न करता अनेकांनी पीक विमा घेतल्याचं निदर्शनात येत असल्याचं कृषी खात्याचे मत आहे.
महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात अधिक पटीने विमा उतरवला गेलाय?
- सरकारी आकडेवारीनुसार नाशिक जिल्यात लागवड क्षेत्र आहे 164 हेक्टर मात्र विमा संरक्षित केलेले क्षेत्र आहे 46 हजार 546 हेक्टर इथे 28 हजार 382% अधिक प्रमाणात विमा उतरवला गेला.
- धुळे कांदा लागवड क्षेत्र आहे 530 हेक्टर विमा उतरवला गेलाय 8631 हेक्टर. लागवड क्षेत्रापेक्षा १1628 टक्के विमा येथे जास्त उतरवला गेला
- अहमदनगर कांद्याचे लागवड क्षेत्र आहे 23 हजार 484 हेक्टर विमा उतरवला गेला आहे 36 हजार 243 हेक्टर इथेही 154% जास्त विमा उतरवला गेलाय.
- पुणे जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र आहे 6748 सेक्टर विमा उतरवला गेला 38215 हेक्टर आणि लागवड क्षेत्रापेक्षा 566% जास्तीचा उमा उतरवला गेला
- सोलापूर जिल्ह्यात लागवड क्षेत्र आहे 3595 हेक्टर, विमा उतरवला गेला 85643 हेक्टर इथेही 241 टक्के जास्त विमा उतरवला गेला.
- सातारा जिल्यात लागवड क्षेत्र आहे 1796 हेक्टर विमा उतरवला गेला 1व हजार 432 हेक्टर इथेही 692% जास्त विमा उतरवला गेला
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्र आहे 2337 हेक्टर विमा उतरवला गेला 1144 हेक्टर इथेही 490% जास्त विमा उतरवला गेला
- बीड जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्र आहे 4659 हेक्टर .विमा उतरवला गेला 23 हजार 883 हेक्टर .515 टक्के जास्त विमा उतरावे गेला .
कांदा पिकात का उतरवला गेला विमा?
कांदा पिकातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमा का उतरवला गेला काय आहे त्याची काय कारण आहेत? इतर खरीप पिकाच्या तुलनेत कांदा पिकासाठी विमा संरक्षणाची रक्कम ही सर्वात जास्त आहे .अगदी 50 टक्के रक्कम मिळाली तरीही रक्कम खूप मोठी असते.शिवाय कितीही रकमेचे विमाचे संरक्षण घेतले तरी शासन शंभर टक्के विमा हप्ता भरते त्यामुळे कोणतीही अधिकचा बोजा विमा घेणाऱ्यावर पडत नाही.
गावनिहाय तपासणी करत कारवाईची मागणी
मात्र पिकाची लागवड न करता टीका करता विमा उतरवणे ही शासनाची फसवणूक असल्याचं आणि अनुदानाचा अपहार असल्याचं पत्रात लिहिले गेले आहे. त्यामुळे बोगस विमा विमा उतरवणाऱ्यांवर जिल्हास्तरीय समितीने गावनिहाय तपासणी करून कारवाई करावी आणि याबाबत कार्यालयास अवगत करण्याचं कृषी संचालकांनी आपल्या पत्रात लिहिलंय.