(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता
Sugarcane : राज्यात अतिरिक्त ऊसाचे उत्पादन झाल्याने ऊसाचा प्रश्न गंभीर झालाय. सहा ते सात लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून आहे.
Sugarcane : राज्यात अतिरिक्त ऊसाचे उत्पादन झाल्याने ऊसाचा प्रश्न गंभीर झालाय. सहा ते सात लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून आहे. तर अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळपही बंद केलय. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. काय आहे राज्यातील ऊसाची परिस्थिती....
ऊसापासून फक्त साखर बनवत राहाल तर परिस्थिती वाईट होईल असा अनेकदा ईशारा नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून दिलाय. आणि हाच ईशारा खरा ठरतो की काय असा प्रश्नआता समोर आलाय. कारण यावर्षी ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याने गाळप हंगाम दीड महिना पुढे सुरू ठेवूनही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. सहा ते सात लाख मेट्रिक टन अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिल्लक आहे. यावर्षी राज्यात एकूण 200 साखर कारखाने कार्यरत होते. त्यापैकी सहकारी तत्त्वावरील 101 आणि खाजगी 99 कारखाने सुरु होते. मात्र आता 170 कारखाने बंद आहेत आणि अवघ्या तीसकारखान्यांचे गाळप सुरू आहे. गाळप हंगाम मागच्या वर्षापर्यंत एप्रिल महिना हा शेवटचा असायचामात्र अतिरिक्त असल्याने जवळपास दीड महिना म्हणजेच 15 जून पर्यंत गाळप हंगाम वाढवण्यातआला आहे. सहा ते सात लाख मेट्रिक टन अजूनही ऊस शिल्लक आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ऊस शिल्लक?
अहमदनगर -1.5 लाख मेट्रिक टन
जालना- 1.5 लाख मेट्रिक टन
लातूर- 1.30 लाख मेट्रिक टन
बीड- एक लाख मेट्रिक टन
नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यातही ऊस अजून शिल्लक आहे.
मागील वर्षी 190 साखर कारखाने कार्यरत होते. त्यापैकी 94 सहकारी तत्त्वावरील आणि 96 खाजगी कारखाने कार्यरत होते. मागील वर्षाचा गाळप हंगाम एप्रिल महिन्यात संपला होता. मात्र आता 15 जून पर्यंत गाळप हंगाम वाढूनही अजून मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. मागील वर्षी साखरेच उत्पादन 10.64 लाख मेट्रिक टन एवढ झालं होत. मात्र आता हेचउत्पादन 13.69 मेट्रिक टन एवढ झालंय. आणि अजुनही ऊस शिल्लक आहे. मागील वर्षी उतारा 10.50 होता मात्र आता 10.40 वरती उतारा आलाय. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक मे पासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सबसिडीदेण्यास सुरुवात केलीय. प्रति टन 200 रुपये आणि वाहतुकीला पाच रुपये अस अनुदान जाहीर केलय.