एक्स्प्लोर

आता जमीन मोजणीसाठी द्यावे लागणार वेगवेगळे दर, संभ्रम दूर करण्यासाठी घेतला निर्णय, सविस्तर माहिती एका क्लिकवर

जमिन मोजणीच्या (Jamin Mojani) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फीमध्ये सुसंगतता यावी यासाठी आजपासून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत.

Jamin Mojani News : जमिन मोजणीच्या (Jamin Mojani) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फीमध्ये सुसंगतता यावी यासाठी आजपासून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. मोजणीच्या प्रकारामुळं निर्माण होणार संभ्रम व वाढता प्रशासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने यामध्ये बदल करण्यात आला आहे. 

1 डिसेंबरपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले, त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होणार

नियमीत आणि दूतगती, अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्याचा कालावधीही निश्चित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता नियमित आणि दूतगती, अशा दोन प्रकारांत जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. साधी, तातडी, अतितातडी आणि अतिअतितातडीच्या जमीन मोजणीचा प्रकार आता निकाली निघाला आहे. जमिनी मोजणीची फी व दर बदलेले असले तरी 1 डिसेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होणार आहे. तर 1 डिसेंबरनंतर अर्ज करणाऱ्यांना नवीन दराने आकारणी केली जाईल, अशी माहिती भूमी अभिलेख कार्यालयातील सूत्रांनी सांगितले आहे.  दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून हे दर लागू होणार होते. परंतु, प्रशासकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, ती आता आज 1 डिसेंबरपासून होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

किती राहणार मोजणी फी?

महानगरपालिका तसेच पालिका हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत नियमित मोजणीसाठी 2000 रुपये आणि दूतगती मोजणीसाठी 8000 रुपये फी आकारली जाईल. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी अर्थात उर्वरित क्षेत्रासाठी अनुक्रमे 1000 आणि 4000 रुपयाप्रमाणे आकरणी केली जाणार आहे. यासोबतच मनपा आणि पालिका हद्दीमधील क्षेत्रात एक हेक्टरचे मर्यादित 3000 रुपये दूतगतीसाठी 12 हजार रुपये आणि एक हेक्टर मर्यादापेक्षा अधिक क्षेत्रासाठी दीड हजार रुपये आणि दूतगतीसाठी 6 हजार रुपये असा दर राहील. कंपन्या, इतर संस्था, महामंडळे, भूसंपादन संयुक्त्त मोजणीसाठीचेही दर निश्चित केले गेले आहेत.

नियमीत मोजणीसाठी किमान 20 दिवसांचा कालावधी

नियमीत मोजणीसाठी किमान 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा कालावधी अर्ज केल्यापासून गृहीत धरण्यात येणार आहे, तर दूतगती मोजणीसाठी कमाल 30 दिवसांचा कालावधी यापुढे रहाणार आहे. दरम्यान, जमिन मोजणीची प्रक्रिया करताना अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आणि तातडीने जमिनीची मोजणी पूर्ण करण्यासाठी आता भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळं आता वेगानं जमिनीची मोडणी करता येणं शक्यत होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget