Maharashtra Agricultural Budget 2021 : पीक विमा योजनेबाबत ठोस निर्णय नाही, अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा : अजित नवले
Maharashtra Agricultural Budget 2021 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला, ज्यानंतर किसान सभेचे नेते अजित नवले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Agricultural Budget 2021 : यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प (Maharsahtra Budget 2022) नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. ज्यानंतर विविध स्तरातील व्यक्तींकडून यावर प्रतिक्रिया येत असून किसान सभेकडून देखील या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देिली आहे. किसान सभेचे (Kisan Sabha) नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून काही योजनांचे स्वागत करत, काही बाबींवर टीका देखील नवले यांनी केली आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येण्याचं या अर्थसंकल्पात सांगण्यात आलं. या घोषणेचं नवले यांनी स्वागत केलं आहे. तर महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत 2 लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंटनुसार 2 लाखांच्या आतील कर्ज सरकार भरेल या तरतूदीची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया नवले यांनी दिली. दरम्यान पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. त्यामुळे ही संपूर्ण योजना मूळापासून बदलली जावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होईल असं वाटत होतं, पण असं झालं नसल्याने किसान सभेकडून नवले यांनी खंत व्यक्त केली. तसंच शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांची तरतूद असून ही रक्कम दीड लाख करावी अशी शेतकऱ्यांची मागणी असून हीच अपेक्षा किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Budget 2022 : छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव, पर्यटना विकासासाठी आणखी कोणत्या घोषणा?
- Maharashtra Budget 2022: उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर
- Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha