एक्स्प्लोर

kharif season : खरीप हंगामासाठी नगर जिल्हा कृषी विभाग सज्ज, शेतकऱ्यांनी सुरु केली मशागत

अहमदनगर कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन दिवसात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी देखील मशागत सुरु केली आहे.

kharif season : राज्यात यंदा मान्सून चांगला होईल अशा अंदाज व्यक्त होत आहे. हवामान विभागानं देखील यंदा देशात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. शेतकर्‍यांना अडचण नको म्हणून अहमदनगर कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन दिवसात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी देखील मशागत सुरु केली आहे. मशागतीसाठी पुरेशा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांपुढे यंदा रासायनिक खतांच्या वाढत्या दराची मोठी समस्या आहे.

राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पुढच्या 24 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरु केली आहे. मशागतीसाठी पुरेशा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांपुढे यंदा रासायनिक खतांच्या वाढत्या दराची मोठी समस्या निर्माण झाल्याचे शेतकरी बाळू वाबळे यांनी सांगितले आहे. 

नगर जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 क्षेत्र

नगर जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार सरासरी क्षेत्र आहे.. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाली होती. यंदा देखील चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्यानं कृषी विभागानं येत्या खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केलं आहे. जिल्हा कृषी विभागानं खरीप हंगामासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 30 हजार 432 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून ,यातील 5 हजार 214 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. दरम्यान दरवर्षी वातावरणातील होणाऱ्या बदलानुसार पिकांच्या लागवड क्षेत्रात देखील बदल झाला असून त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी सांगितलं आहे.

'या' बियाणांना अधिक मागणी

अहमदनगर जिल्ह्यात खरिपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन , बाजरी यांच्या बियाणांची अधिक मागणी असते. सध्या कृषी विभागाकडे  तुरीचे बियाणे हे 341 क्विंटल, मूग 539 क्विंटल, उडीद 2232 क्विंटल, सोयाबीन 18965 क्विंटल, बाजरी 1631 क्विंटल उपलब्ध झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे घेताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची पक्की पावती घ्यावी ज्यावर लॉट नंबर आहे का ते पाहावं असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी म्हटलं आहे. खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेलं चांगलं सोयाबीनचं बियाणे वापरावं असेही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget