farming success: नोकरी सोडली, धाराशिवच्या पठ्ठ्यानं शेतीतून वर्षाकाठी काढलं दीड कोटींचं उत्पन्न
दोन्ही भावांनी मिळालेले उत्पन्न गुंतवत असून दीड एकरात शेतीला सुरुवात केली.प्रायोगिक शेती करत या शेतकऱ्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय.
Dharashiv Farming Success: मराठवाड्यातील शेतकरी अनेक प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञान वापरत शेतीतून कमाई करताना दिसतात. शेतीत पैसा नाही अशी तक्रार अनेक तक्रार करतात. पण धाराशिवच्या एका शेतकऱ्यानं थेट नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो वर्षाकाठी दीड कोटींचं उत्पन्न कमवलं आहे. प्रायोगिक शेती करून नवा आदर्श निर्माण केला आहे.
धाराशिव येथील रामराजे गोरे आणि नागेश गोरे यांनी टेल्को कंपनीतली नोकरी सोडून या दोन्ही भावडांनी त्या पैशातून शेती सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे तो यशस्वीही झाला. आता वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल हे शेतकरी करतात. रामराजे यांनी पुण्यातील नोकरी सोडली. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी प्रथम विहीर खोदली आणि आधुनिक पद्धतीनं शेती केली. भाऊ नागेश गोरे यांनीही त्यांच्या कामात मदत केली. दोघांनीही या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय.
दीड एकरात शेतीला सुरुवात
दोन्ही भावांनी मिळालेले उत्पन्न गुंतवत असून दीड एकरात शेतीला सुरुवात केली. आता त्यांच्याकडे दीड एकर जमीन, ३ विहिरी, ९ एकर द्राक्षे, ३ एकर डाळिंब आहे. ७ एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. दहावी शिक्षण झालेले रामराजे गोरे यांनी १९९३ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं नाला बांधण्याच्या कामाला जायचे.
खोदलेल्या विहिरीतून अख्या शेताला पाणी
या भावंडांनी खोदलेल्या विहिरीतून अख्या शेताला पाणी पुरवलं जातं. या शेतीतून दीड कोटींपर्यंत त्यांनी कमाई केली आहे. प्रायोगिक शेती करत या शेतकऱ्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय. सुरुवातीला मिळालेल्या पैशातून त्यांनी विहिर खोदली. त्यानंतर गरजेनुसार आणखी दोन विहिरी खोदल्या. ज्या विहिरींमधून यांच्या साऱ्या शेताला पाणी दिलं जातं.