एक्स्प्लोर

Farmer Success: जळगावच्या केळीचा इराणमध्ये डंका! एक केळीचा घड 35 किलोंचा, लाखोत कमवतोय हा शेतकरी..

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळबागा जपणं तसं कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरघोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवल्याचं दिसतंय.

Farmer Success Story: जळगावची केळी ही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रीय समजली जाते. दर्जेदार उत्पन्नासह देशातच नाही पण परदेशातही निर्यात करण्यावर शेतकरी भर देत असल्याचं दिसतं. आता जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं केळीची निर्यात करत लाखोंमध्ये नफा कमावलाय. राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या शिवारातल्या केळीचा डंका  आता आखाती देशात वाजतोय. इराणमध्ये निर्यात करत एकरी अव्वल उत्पादन त्यांनी घेतलंय. त्यांच्या एका केळीच्या घडाचं वजन तब्बल ३५ किलो आहे. एरवी प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रुपयांचा भाव केळीला मिळत असताना निर्यात करत क्विंटलमागे  तब्बल १७५० रुपयांचा भाव त्यांना मिळतोय.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळबागा जपणं तसं कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरघोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवल्याचं दिसतंय.

गिरणा नदीच्या समृद्ध तालुक्यांमध्ये केळीचं उत्पादन

जळगाव केळीचं आगार समजलं जातं. पाण्याचं योग्य नियोजन करत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं. गिरणा नदीच्या पाण्यानं समृद्ध असणाऱ्या पाचोरा आणि भडगाव परिसरात केळीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. याच भडगाव तालुक्यातील राजेंद्र पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्यानं आपली केळी थेट इराणला निर्यात करत चांगला नफा कमावलाय. साधारण ३५ ची रास त्यांच्याकडे असून प्रतिक्विंटल १७५० रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. 

परदेशी निर्यात करत लाखात कमाई

राजेंद्र पाटील यांची सहा एकर शेती असून त्यांनी 9000 टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतात केळीची काढणी सुरु असून देशांतर्गत आणि परदेशीही ते केळी पाठवतात. इराणमध्ये राजेंद्र पाटील यांच्या केळीला वाव मिळाला असून त्यांना भरघोस उत्पन्न घेतलं आहे. केळीला साधारणपणे १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना १७०० रुपयांचा भाव त्यांना मिळाल्यानं विक्रमी कमाई त्यांनी केल्याचं बोललं जातंय. खत, मशागत आणि पाण्याचे व्यवस्थापन करत भडगाव तालुक्यातून इराणला निर्यात करत केळीतून त्यांनी विक्रमी कमाई केली आहे.

केळीचा घड 35 किलोंचा!

साधारणपणे केळीच्या सामान्य घडाचं वजन २० ते २५ किलो एवढे असते. पण आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नियोजन साधल्याने या शेतकऱ्याच्या केळीच्या एका घडाचे वजन तब्बल ३५ किलोंचे भरले आहे. त्यामुळेच या केळीला चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget