Export From India : दुग्धजन्य पदार्थासह 'या' शेतमालांच्या निर्यातीत मोठी वाढ, वाणिज्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
Export From India : भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात (Export of agricultural produce) होत आहे. या निर्यातीत (Export) सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आलं आहे.
Export From India : भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात (Export of agricultural produce) होत आहे. या निर्यातीत (Export) सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आलं आहे. दुग्धजन्य पदार्थासह (Dairy Product Export), गहू, डाळी, तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं (Ministry of Commerce) दिली आहे. निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी वाणिज्य मंत्रालयानं जाहीर केली आहे. या निर्यातीतून शेतकऱ्यांसह (Farmers) व्यावसायिकांचा मोठा फायदा झाल्याचे वाणिज्य मंत्रायलानं सांगितलं आहे.
परदेशातील नागरिकांची भारतीय शेतमालांना पसंती
देशातील उत्पादनांना परदेशात मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. परदेशातील लोकांची भारतीय फळांना आणि भाज्यांना मोठी मागणी आहे. फळे आणि भाज्यासंह दुग्धजन्य पदार्थ, गहू, डाळी, तांदूळ यांसह अनेक धान्यांची निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीची तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे. हा सर्व प्रकारच्या उत्पादनांचा डेटा आहे. एका वर्षापूर्वी या उत्पादनांची निर्यात $15.07 बिलियन होती, ती आता $17.43 बिलियन झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. शेतकरी, सरकार, व्यापारी सगळेच अन्नधान्याच्या निर्यातीत झालेली वाढ पाहून खूश आहेत. निर्यात वाढल्याने शेतकरी आणि व्यावसायिकांचे उत्पन्न वाढले आहे.
फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 2.60 टक्क्यांची वाढ
एप्रिल ते नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 2.60 टक्के वाढ झाली आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत 4 टक्क्यांनी वाढ झाली, तर अन्नधान्यांसारखी खाद्यपदार्थांची निर्यात 28.29 टक्क्यांनी वाढल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गहू, डाळींच्या निर्यातीतही वाढ
डाळींच्या निर्यातीची स्थितीही ठीक आहे. नोव्हेंबर 2022-23 दरम्यान डाळींच्या निर्यातीत 90.49 टक्के वाढ झाली आहे. गव्हाच्या निर्यातीत 29.29 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ 1 हजार 508 दशलक्ष डॉलर्सपर्यंत नोंदवली गेली आहे.
दुग्धजन्य पदार्थ, तांदळाची निर्यातही वाढली
दुग्धजन्य पदार्थ आणि तांदळाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये 33.77 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर बासमती तांदळाच्या निर्यातीत 39.26 टक्के वाढ झाली आहे. तर बिगर बासमती तांदळाची निर्यात 5 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: