Chitale Dairy : आशियातील सर्वात मोठ्या 'सेक्सेल सीमेन जेनेटिक' प्रयोगशाळेचं उद्घाटन, दूध उत्पादनात होणार वाढ; चितळे डेअरीचा पुढाकार
Chitale Dairy : चितळे डेअरीच्या (Chitale Dairy) वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठी 'सेक्सेल सीमेन जेनेटिक' प्रयोगशाळा (Sexel Simon Laboratory) उभारण्यात आली आहे.
Chitale Dairy News : चितळे डेअरीच्या (Chitale Dairy) वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठी 'सेक्सेल सीमेन जेनेटिक' प्रयोगशाळा (Sexel Simon Laboratory) उभारण्यात आली आहे. सांगलीच्या (Sangli) भिलवडी येथील प्रयोगशाळेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हैस, गाय या पशूंना कृत्रिम रेतन करण्यासाठी शंभरहून अधिक रेडे, वळू जोपासले जाणार आहेत. तसेच केवळ अधिक दूध देणार्या मादीचाच जन्म कृत्रिम रेतनाद्बारे या प्रयोगशाळेत देण्यावर भर देण्यात येणार आहे.
भारतात दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक, जगाच्या उत्पादनाचा वाटा केवळ 10 टक्के
जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा (Dairy Business) विचार केला तर भारतात (India) दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा केवळ 10 टक्के आहे. जनावरांपासून मिळणार्या दुधाचे प्रमाण कमी असल्यानं दूधाच्या परिमाणात वाढ होण्यासाठी ब्रह्मा प्रकल्पात संशोधन करण्यात आला आहे. सिमेन्समधील स्त्री बीज विलग करुन त्याचे मुर्हा म्हशीच्या गर्भामध्ये रोपण करण्यात आलं आहे. हे रोपण यशस्वी झाले असून हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती जीनस एबीएसचे संचालक विश्वास चितळे यांनी दिली.
तंत्रज्ञानाचा उपयोग पशुधनाची उत्पादकता वाढवण्यावर भर
उच्चतम उत्पादन क्षमता असलेले निवडक वळूंची अमेरिकेतून भारतात आयात केली आहे. ब्रह्मा या बुल सेंटरमध्ये त्यांची जोपासना करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 35 ते 40 लाख सिमेन डोसेसचे उत्पादन करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी होत आहे. ब्रम्हा बुल सेंटरमध्ये उच्च प्रतीच्या गाई म्हैशींचे 30 ते 40 लाख सिमेन डोस तयार होतात. 10 लाख सेक्सेल सिमेन्स म्हणजे फक्त मादी जातीचे सिमेन डोस तंत्रज्ञानाचा वापर करुन सेपरेट केले जातात. ते भरवल्यानंतर 95 टक्के गाई म्हैशींना पाडी किंवा रेडीच होते.
सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रयोगशाळेमुळं भारतीय दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: