एक्स्प्लोर

तोंडचा घास हिरावला! बीडमध्ये केळीच्या बागेला भीषण आग, साडेपाच हजार झाडे जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान 

बीडच्या मोहखेड येथे केळीच्या बागेला आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीमुळं संपूर्ण केळीची बाग जळून खाक झाली आहे. चार एकरावर ही केळीची बाग होती.

Beed Bananas Fire News :  बीडच्या मोहखेड येथे केळीच्या बागेला आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीमुळं संपूर्ण केळीची बाग जळून खाक झाली आहे. चार एकरावर ही केळीची बाग होती. तर काही दिवसात बागेतील केळी बाजारात पाठवली जाणार होती. मात्र आज दुपारी लागलेल्या आगीत बागेतील साडेपाच हजार केळीचे झाडे जळाले आहेत. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या केळी उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळं ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग संपूर्ण केळीच्या बागेमध्ये पसरली

या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग संपूर्ण केळीच्या बागेमध्ये पसरली आहे. यावेळी आजुबाजुच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भर दुपारी आग लागल्याने आटोक्यात आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान प्रशासनाने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकरी रणधिर सोळंके यांनी केली आहे. दरम्यान, एकाच वेळी शेतकऱ्याची चार एकर केळीची संपूर्ण बाग जळून खाक झाल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या चार एकर बागेत साडेपाच हजार केळीची झाडे होती. या बागेतील सर्व केळी काही दिवसातच विक्रीसाठी बाजारात नेण्यात येणार होती. अशातच शॉर्टसर्किट झाल्यामुळं केळीच्या बागेला आग लागून शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरवला आहे. मोठा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळं तातडीने या जळालेल्या बागेचा सरकारनं पंचानामा करावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे, तसेच तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली आहे.

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याच्या घरातील 18 क्विंटल कापूस आणि जीवन उपयोगी साहित्य जळून खाक

बीडच्या चिंचाळा इथं देखील आगीची भीषण घटना घडली आहे. या ठिकाणी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याच्या घरातील 18 क्विंटल कापूस आणि जीवन उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चिंचाळा येथील शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आग विझवण्याकरता परिसरातील लोकांनी अटोकाट प्रयत्न केले. परंतू, ही आग इतकी भीषण होती की या आगीने घरात ठेवलेला 18 क्विंटल कापूस संपूर्णपणे जळाला. यामुळं शेतकऱ्याचे अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. यासह घरातील साहित्यही जळाले. दरम्यान प्रशासनाने या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget