एक्स्प्लोर

काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त

Beed Banana Farming : केळीचा बाजार उठल्याने शेतात असा केळीचा सडा पडलाय.पूर्वी  बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलचा भाव मिळणाऱ्या केळीला आता कवडीमोल भाव मिळत असल्यानं केळी जनावरांसमोर टाकावी लागत आहे 

Beed Banana Farming :  आपल्याकडे केळी पिकवणारा शेतकरी हा बागायतदार शेतकरी समजला जातो. आता मात्र याच बागायतदार शेतकऱ्यांवर परवडत नाही म्हणून केळीचे झाड शेतीच्या बाहेर टाकण्याची वेळ आलीय. झाडाला लागडणारी केळी काढायला सुद्धा परवडत नाही म्हणून आता अशीच पिकून खराब होऊ लागलीय. गेवराईच्या श्रीपत अंतर्वाला गावच्या वैजनाथ वाकळे यांची एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी ही बाग वाढवली. मात्र विक्रीच्या वेळेस या केळीला दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतलाय.

मुबलक पाणीसाठा असल्याने श्रीपत अंतर्वाला गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. यावर्षी मात्र केळीचा बाजार उठल्याने शेतात असा केळीचा सडा पडलाय. पूर्वी  बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलचा भाव मिळणाऱ्या केळीला आता कवडीमोल भाव मिळत असल्याने भानुदास वाकळे यांना आपल्या तीन एकरावरची केळी जनावरांसमोर टाकावी लागत आहे
 
पारंपारिक शेतीवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणार कमी उत्पादन यामुळे अनेक शेतकरी हे वेगवेगळ्या फळबागांची लागवड करतात. गेवराई तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती आणि त्यातून त्यांना लाखोंचा नफा मिळायचा. यावर्षी मात्र केळीला भावच मिळत नसल्यानं याच केळीच्या बागा तोडून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे

सध्या केळीला केवळ दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलला भाव आहे.  म्हणजे एका किलोला दीड ते दोन रुपयांचा भाव आहे. एका किलो सहा ते सात केळी बसतात. म्हणजे या एका केळीला शेतकऱ्यांना 25 ते 30 पैशे भाव मिळतोय. पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. आता मात्र या केळीसाठी केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे म्हणूनच बहारदार केळीच्या बागा आता उध्वस्त होऊ लागले आहेत.

पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला सुरुवात केली खरी मात्र कधी दुष्काळ तर कधी अवकाळी यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने केळी पिकवली. आता मात्र या खेळीला भाव मिळत नसल्याने हे शेतकरी मोठ्या आर्थिक कात्रीत सापडले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget