एक्स्प्लोर

Success story: ऊसाला फाटा देऊन 2.5 एकरात फुलवला आल्याचा मळा! नगरचा शेतकरी मिळवतोय 15 लाखांचे उत्पन्न

अहमदनगरच्या शेतकऱ्याने ऊस शेतीला फाटा देत अडीच एकरात आल्याची लागवड केली .आता लाखोंचा उत्पन्न तो मिळवत आहे .कशी केली त्यांनी शेती ?

Ahmednagar success story: आजकाल शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत कमी क्षेत्रात वेगळे प्रयोग करताना दिसतात. काही जण ड्रॅगन फ्रुट लावतात तर अनेकांना फळ पिकांची भुरळ पडते. पण अहमदनगरच्या एका शेतकऱ्याने उसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मातीत केवळ  अडीच एकरावर  आल्याचा मळा फुलवत  लाखोंचं उत्पन्न मिळवले आहे. मागच्या वर्षीही या शेतकऱ्याने एकरभर क्षेत्रातून 108 क्विंटल आल्याचे उत्पन्न काढत 10 लाखांचं उत्पन्न मिळवलं होतं. आता आलं काढणीला आलं असून शेतकऱ्याला किमान 14 ते 15 लाख रुपये निश्चित नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. (Ginger farming)

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सोनई या गावचे  संग्राम येळवंडे यांनी पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत सव्वादोन एकरामध्ये आल्याची लागवड केली व हा प्रयोग यशस्वी केलाय. कमीत कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवत आल्यातून लाखोंची कमाई करणारा या शेतकऱ्याचं परिसरात कौतुक होत आहे.(Agriculture success story)

दीडशे क्विंटल आल्याची अपेक्षा

आज त्यांचे हे अडीच एकरातील आले काढणीला आले असून एकरी 130 ते 150 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्याला आहे. सध्या बाजारात आल्याची आवक चांगली असल्यानं भाव घसरले आहेत. तरीही येत्या काळात  आल्यातून  एकरी 14 ते 15 लाखांचे उत्पन्न संग्राम येळवंडे यांना अपेक्षित आहे.  मागच्या वर्षी एका एकरात आल्याची लागवड या शेतकऱ्याला फायद्याची ठरली  शेतावरच नऊ हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता .त्यातून दहा लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले होते.  त्यामुळे यंदा पुन्हा एकदा क्षेत्र वाढवत अडीच एकरात आल्याची लागवड या शेतकऱ्याने केली.

कशी केली आल्याची शेती?

सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचनाच्या सहाय्याने एकरी 9 ते 10 क्विंटल बियाणे यावर्षी या शेतकऱ्याने वापरले व आल्याची लागवड केली.यावर्षी लागवडी पूर्वी त्यांनी शेतामध्ये बेड तयार केले व बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा वापर करत आल्याची लागवड केली. आल्या सोबतच ते कांदा, ऊस व फळबागांमध्ये आंबा या पिकांची देखील ते शेती करतात. संग्राम येळवंडे यांना त्यांचा पेशाने इंजिनियर असणारा भाऊ धनंजय येळवंडे यांची देखील मोलाची मदत होते. पारंपरिक शेतीला फाटा देत आल्यासारख्या पिकाचा यशस्वी प्रयोग करत या शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्हा सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाव काढलय

महत्त्वाच्या बातम्या

Sugarcane Crushing Season:: मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्णय
मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पण कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज, तुमचा जिल्ह्यात पाऊस पडणार का? 
राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पण कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज, तुमचा जिल्ह्यात पाऊस पडणार का? 
तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, अंबादास दानवेंचा ओमराजेंबवर हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या 
तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, अंबादास दानवेंचा ओमराजेंबवर हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या 
Rain : बळीराजाची चिंता वाढली! तीन महिने झालं तरी पाऊस नाही, सप्टेंबर महिन्यात कशी असणार परिस्थिती? कुठं कुठं पडणार पाऊस? 
बळीराजाची चिंता वाढली! तीन महिने झालं तरी पाऊस नाही, सप्टेंबर महिन्यात कशी असणार परिस्थिती? कुठं कुठं पडणार पाऊस? 

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Embed widget