(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : अकोला बाजार समितीत तुरीला हंगामातील सर्वाधिक दर, मागणी वाढल्यानं तुरीला अच्छे दिन
Agriculture News : तुरीच्या दरात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. काल (20 एप्रिल) अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला आहे.
Agriculture News : तूर उत्पादक (Tur producer) शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. तुरीच्या दरात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. काल (20 एप्रिल) अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला या हंगामातील सर्वाधिक 8905 रुपये एवढा प्रति क्विंटलला दर मिळाला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti Akola) काल 1314 क्विंटल तुरीची आवक झाली होती. मात्र, अलीकडे बाजारात तुरीच्या वाढत्या मागणीमुळं तुरीला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे.
तुरीला सरासरी 7900 ते 8100 एवढा सरासरी दर
तुरीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. बाजारात तुरीच्या वाढत्या मागणीमुळं तुरीला अच्छे दिन आल्याची स्थिती आहे. अकोल्यात सध्या तुरीला सरासरी 7900 ते 8100 एवढा सरासरी भाव प्रतिक्विंटलला मिळत आहे.
गेल्या आठवड्यात अकोला बाजार समितीत तुरीला मिळालेला सर्वोच्च भाव
तारीख भाव (प्रती क्विंटल)
10 एप्रिल 8770
12 एप्रिल 8830
13 एप्रिल 8675
15 एप्रिल 8800
17 एप्रिल 8800
17 एप्रिल 8700
19 एप्रिल 8650
20 एप्रिल 8905
दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा
सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक कमी असल्यामुळं त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. मागील काही दिवसात तुरीच्या दरात चढउतार होत असून गुरुवारी तुरीच्या दारात 255 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं तुरीचे दर 9 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. सोमवारी 6 हजार पासून 8 हजार 800 रुपये तर मंगळवारी 7 हजार 10 पासून 8 हजार 700 रूपयांपर्यत प्रतिक्विंटल मागे तुरीला भाव होता. त्यानंतर बुधवारी तुरीच्या दरात 50 रुपयांनी घसरण होऊन दर 6 हजार ते 8 हजार 650 रूपयांपर्यत आले. परंतु, आज गुरुवारी तुरीच्या दरात मोठी सुधारणी झाली आहे. अडीचशे रुपयांनी वाढ झाल्याने दर कमीत कमी 6 हजार पासून 8 हजार 905 रुपयांपर्यत पोहोचले आहे. या आठवड्यात आतापर्यत 6 हजार 356 क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली आज 1 हजार 314 एवढी तुरीची आवक झाली आहे. दरम्यान, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा तूर उत्पादकांना मोटठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानं उत्पादन कमी झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: