एक्स्प्लोर

Green House : ग्रीन हाऊससाठी राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना 50 ते 70 टक्के अनुदान, शेतकऱ्यांना होतोय फायदा  

Green House: राजस्थान सरकारनं शेतीला हवामान बदलाचा (Climate Change) फटका बसू नये यासाठी हरितगृह (Greenhouse) उभारणीच्या खर्चावर 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Subsidy on Green House: शेतकरी सातत्यानं शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगला नफाही मिळवत आहे. मात्र, शेतकऱ्यांना सातत्यानं नैसर्गिक संकटांचा (Natural Disaster) सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. राजस्थान सरकारनं शेतीला हवामान बदलाचा (Climate Change) फटका बसू नये यासाठी हरितगृह (Greenhouse) उभारणीच्या खर्चावर 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हे अनुदान दिले जात आहे. 

पॉलीहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये अशा संरक्षित ठिकाणी बिगरहंगामी भाजीपाल्याची यशस्वी लागवड करता येते. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घेता येते. ग्रीनहाऊसमध्ये पिकवलेल्या भाज्यांचे हिवाळ्यात दव आणि उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्र लाटेपासून संरक्षण करता येते. त्यामुळं राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना आता यासाठी अनुदान दिलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ

प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लहान, अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना  ग्रीन हाऊसच्या खर्चावर 70 टक्क्यांचं अनुदान दिलं जात आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणात 50 टक्क्यांचं अनुदान दिल जात आहे. या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला किमान चार हजार चौरस मीटरचे हरितगृह उभारावं लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अर्ज करताना शेतकऱ्याला त्याचे मूळ रहिवासी प्रमाणपत्रही जोडावं लागणार आहे. तसेच शेततळ्यात सिंचनाची व्यवस्था असणं गरजेचं आहे. माती-पाणी परीक्षण केल्याचा चाचणी अहवाल द्यावा लागणार आहे.  तसेच शेतकऱ्याला जात प्रमाणपत्रही जोडावं लागणार आहे. 

कुठे कराल अर्ज 

राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येत असलेल्या ग्रीन हाऊसवरील अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज किसान या अधिकृत पोर्टलवर rajkisan.rajasthan.gov.in  वर अर्ज करावा लागेल. शेतकरी त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा ई-मित्र केंद्रावर देखील अर्ज करू शकतात. या योजनेच्या संदर्भात, राजस्थान सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://dipr.rajasthan.gov.in/  वर तपशील देखील देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी किंवा फलोत्पादन विभागाच्या कार्यालयाशीही संपर्क साधू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget