शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणारे देशातील 199 अन् राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार
Agriculture News : अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
Agricultural Meteorological Station : मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) प्रमाण वाढले असून, यामुळे सतत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे (Farmers) यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. अशात अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा. मात्र, आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे, किंवा टाळता यावे यासाठी भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये संपूर्ण देशभर 199 जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 11 कृषी हवामान केंद्राचा समावेश होता. कृषी हवामान तज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक अशी दोन पदे केंद्रामध्ये भरण्यात आली होती. या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पाच दिवसीय कृषी सल्ला देण्यात येत होता. त्याचा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी फायदा होत होता.
देशातील 30 कोटी शेतकऱ्यांचे नुकसान
मात्र देशातील हे सर्व 199 केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशातील 30 कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता हे कार्यरत असलेले 398 कर्मचारी अधिकारी आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकार कडे हे केंद्र सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
शेतकरी आधीच संकटात...
गेल्याच तीन चार वर्षांपासून सतत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. प्रत्येक वर्षी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशात जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राकडून अनेकदा हवामानाचा अंदाज दिला जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांना वाचवण्यासाठी काही प्रमाणात हालचाली करता येतात. अनेकदा पीक काढून ठेवल्यावर पावसाचा अंदाज मिळाल्यावर शेतकरी त्या पीकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, आता हवामान केंद्रच बंद झाल्यावर शेतकऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे केंद्र बंद करू नयेत अशी मागणी होतांना पाहायला मिळत आहे. सोबतच कृषी हवामान केंद्रात कार्यरत असलेले 398 कर्मचारी अधिकारी आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट कायम, नांदेड जिल्ह्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांच मोठं नुकसान