एक्स्प्लोर

Agriculture News : परभणीत कापसावरील बोगस औषधाची विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल

कापसावरील (Cotton) बोगस फवारणी औषध विक्री करणाऱ्या दोन जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Agriculture News : कापसावरील (Cotton) बोगस फवारणी औषध विक्री करणाऱ्या दोन जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसावरील औषधांची बोगस विक्री करताना शेतकऱ्यांना दोन जणांना पकडले होते. या प्रकरणी तब्बल 30 तासानंतर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश तरोडकर आणि दत्ता शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
मानवत परिसरामध्ये एका कारच्या माध्यमातून पेन्सी बायो या कंपनीचे बायो आर 303 हे बोगस फवारणी औषध विक्री केले जात असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील बावळे, अर्जुन पंडित या दोन शेतकऱ्यांनी या कारचा पाठलाग करुन त्यांना पकडले. यामध्ये तब्बल 4 लाख 65 हजार 2376 रुपयांची बोगस औषधे असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. यानंतर या शेतकऱ्यांनी सदर बोगस औषधांची गाडी मानवत पोलीस ठाण्यात आणली. या संदर्भामध्ये कृषी विभाग, गुण नियंत्रण पथक तसेच मूळ कंपनी प्रतिनिधीला कळवण्यात आले. त्यानंतर तब्बल 30 तासानंतर पेन्सी बायो या कंपनीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सतीश तरोडकर आणि दत्ता शिंदे यांच्या विरोधात 420, 465, 34 भादवी 1860 तसेच कलम 51, 63, 64 कॉपी राईट अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करत आहेत. सध्या ही सर्व बोगस औषधे पोलिसांनी जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कृषी विभागाकडूनही करवाई केली जाणार आहे.

तब्बल 30 तासांनंतर गुन्हा दाखल  

या प्रकरणात बोगस औषध पकडलेले शेतकरी सुनील बाबळे, रामराजे महाडिक, रमेश साठे  अर्जुन पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी करत होते. मात्र, नेमकी कारवाई कोणी करायची यातच कृषी विभागाचे अधिकारी, मूळ कंपनी पेन्सी बायो चे प्रतिनिधी यांच्यात संभ्रम होता. अखेर 30 तास उलटल्यानंतर पेन्सी बायो कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या सर्व कारवाईत कृषी विभागाकडून ज्या पद्धतीने कारवाई करणे अपेक्षित होते ते होताना दिसले नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
Embed widget