Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्यातल्या वादळी पावसानं 15 घरं कोसळली, केळीसह टरबजू पिकांचं मोठं नुकसान
जळगाव जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालं आहे. अमळनेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि पावसानं पंधरा घरे कोसळली आहेत तर शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
Jalgaon Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालं आहे. अमळनेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि पावसानं पंधरा घरे कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला आहे. तर पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे बांध फुटून त्यांच्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेतीचा कस देखील वाहून गेला आहे. तसेच केळी पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात काही भागात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीनं पंधरा घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तर पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेतीचं नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पहिल्याच पावसानं केळी पिकासह अनेक घराचं नुकसान झालं आहे. मागील दोन ते तीन दिवसात रावेर, चाळीसगाव , भडगाव, चोपडा आणि अमळनेर या तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि पाऊस झाल्यानं कोट्यवधी रुपयांच्या केळी पिकांसह अनेक घरांचं नुकसान झालं आहे.
अमळनेर तालुक्यात झालेल्या पावसानं पंधरा घरे कोसळली तसेच यात एका गाईचा मृत्यु झाला आहे. सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही. अमळनेर तालुक्यातील माल पूर, धार, अंतुरली भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे बांध फुटून त्यांच्या कापूस टरबुज पिकासह जमिनीचा कस वाहून गेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेसंदर्भात प्रशासनानं तातडीने याची दखल घेत सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पावसामुळं झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या पवसामुळं शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागणार आहेत.
राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती, त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: