News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी!

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टलाच का असतो? जवाहरलाल नेहरु यांनी भाषण दिलं, त्यावेळी गांधीजी कुठे होते? यासह स्वातंत्र्याबाबतच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया

FOLLOW US: 
Share:
मुंबई : भारत उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला 72वा स्वतंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट, 1947 भारतीय इतिहासातील ती तारीख आहे, जेव्हा आपला देश ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला होता. भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टलाच का असतो? जवाहरलाल नेहरु यांनी भाषण दिलं, त्यावेळी गांधीजी कुठे होते? यासह स्वातंत्र्याबाबतच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित दहा रंजक गोष्टी 1. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते. भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नोआखलीमध्ये होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरु असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते. 2. 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झालं, त्यावेळी जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं होतं की, "15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या." 3. गांधी यांनी या पत्राचं उत्तर असं पाठवलं की, "कलकत्त्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत असताना मी जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकतो? दंगल रोखण्यासाठी मी माझे प्राण देईन." 4. जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासिक भाषण अर्थात 'ट्रिस्ट विथ डेस्टनी' 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हॉईसराय लॉजमधून (सध्याचं राष्ट्रपती भवन) दिलं होतं. तेव्हा नेहरु पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं, पण गांधीजी त्या दिवशी नऊ वाजताच झोपले होते. 5. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यांच्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरुंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि त्यानंतर इंडिया गेटजवळ प्रिन्सेस गार्डनमध्ये एक सभेला संबोधित केलं. 6. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असं झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या एका पत्रानुसार, "नेहरुंनी 16 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता." 7. भारताचे तत्कालीन व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे माध्यम सचिव कॅम्पबेल जॉनसन यांच्या माहितीनुसार, "जपानच्या शरणागतीची दुसरं वर्ष 15 ऑगस्टला होणार होतं. त्याच दिवशी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय झाला." 8. 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला. 9. भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला खरा, पण देशाचं स्वत:चं राष्ट्रगीत बनलं नव्हतं. रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्येच 'जन-गण-मन' लिहिलं होतं, परंतु 1950 मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली. 10. 15 ऑगस्त हा भारतासह इतर तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. दक्षिण कोरिया जापानपासून 15 ऑगस्ट, 1945 रोजी स्वतंत्र झाला होता. ब्रिटनपासून बहारीन 15 ऑगस्ट, 1971 रोजी आणि फ्रान्सपासून कांगो 15 ऑगस्ट, 1960 मध्ये स्वतंत्र झाला होता.
Published at : 14 Aug 2018 10:08 AM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: 35 रुपयांवरुन वाद, पानटपरीवर मित्रांनीच मित्राच्या काकांना जिवंत जाळलं; मुंबईतील घटनेने सर्व हादरले, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: 35 रुपयांवरुन वाद, पानटपरीवर मित्रांनीच मित्राच्या काकांना जिवंत जाळलं; मुंबईतील घटनेने सर्व हादरले, नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...

KDMC Election 2026: डोंबिवलीतील भाजप-शिवसेना राडा प्रकरण; शिंदे गटाचे दोन उमेदवारांना पोलिसांकडून अटक; दोघांचीही तब्येत खालावली

KDMC Election 2026: डोंबिवलीतील भाजप-शिवसेना राडा प्रकरण; शिंदे गटाचे दोन उमेदवारांना पोलिसांकडून अटक; दोघांचीही तब्येत खालावली

Makar Sankranti 2026: तो दिवस आलाच! आजची मकर संक्रांत 3 राशींचं आयुष्य पूर्णपणे पालटणार! शुक्रादित्य राजयोगासह जुळले अनेक शुभ योग, पैसा, नोकरी...

Makar Sankranti 2026: तो दिवस आलाच! आजची मकर संक्रांत 3 राशींचं आयुष्य पूर्णपणे पालटणार! शुक्रादित्य राजयोगासह जुळले अनेक शुभ योग, पैसा, नोकरी...

Horoscope Today 14 January 2026: आज मकर संक्रातचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने प्रश्न लागतील मार्गी, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 14 January 2026: आज मकर संक्रातचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने प्रश्न लागतील मार्गी, आजचे राशीभविष्य वाचा

टॉप न्यूज़

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?