NZ vs ENG : इंग्लंडकडून न्यूझीलंडला क्लीन स्वीप, तिसरा सामना 7 विकेट्सने जिंकला
England vs New Zealand : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंड 7 गडी राखून विजयी झाला आहे.
![NZ vs ENG : इंग्लंडकडून न्यूझीलंडला क्लीन स्वीप, तिसरा सामना 7 विकेट्सने जिंकला NZ vs ENG England won third Test gave clean sweep to New Zealand NZ vs ENG : इंग्लंडकडून न्यूझीलंडला क्लीन स्वीप, तिसरा सामना 7 विकेट्सने जिंकला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/bc8d871db9dd8636f56eaac4ec5ad4fb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New Zealand tour of England : इंग्लंड संघाने आपला तुफानी फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात घातली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (NZ vs ENG) यांच्यात लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर (Headingley) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला गेला. या सामन्यात 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने सामना जिंकला. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला 113 धावांची गरज होती, जॉनीने रुटच्या मदतीने फिनिशिंग करत सामना जिंकला. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडच्या संघाला मात देत मालिकेत 2-0 नं विजयी आघाडी घेतली होती. आता अखेरचा सामना जिंकत क्लीन स्वीप न्यूझीलंडला दिला आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण डॅरी मिचेलने ठोकलेल्या शतकाला टॉम ब्लंडलची मिळालेली 55 धावांची साथ एवढीच कायती कामगिरी न्यूझीलंड संघाला करता आली. त्यांनी पहिल्या डावाकत 329 धावा केल्या. पण बदल्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोच्या 162 आणि जेमी ओव्हरटनच्या 97 धावांनी इंग्लंडने पहिल्या डावात 360 धावा केल्या. त्यानंतर 31 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने 326 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 296 धावांची गरज होती. ही गरज ओली पोप, जो रुट आण जॉनी बेअरस्टोच्या अर्धशतकाने पूर्ण करत सामना 7 विकेट्सने इंग्लंडने जिंकला.
3-0 ने मालिका इंग्लंडच्या खिशात
याआधी मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले होते. दोन्ही सामने त्यांनी 5 विकेट्सने जिंकले असल्याने याआधीच मालिकेत त्यांनी 2-0 च्या फरकाने विजयी आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकत इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकत न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)