IND vs NZ 3rd T20I : आजची निर्णायक लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर, मैदानासंबधी या खास गोष्टी नक्की वाचा!
IND vs NZ: भारत (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.
IND vs NZ, Narendra Modi Stadium : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा निर्णय आज होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत असताना या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ahmedabad) होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी येथे 6 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय संघ मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने येथे चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्याआधी या स्टेडियमवरील काही महत्त्वाची आकडेवारी जाणून घेऊ...
- सर्वोच्च सांघिक धावसंख्या: 20 मार्च 2021 रोजी टीम इंडियाने येथे इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यात 2 विकेट गमावून 224 धावा केल्या.
- सर्वात कमी सांघिक धावसंख्या: 12 मार्च 2021 रोजी झालेल्या T20 सामन्यात भारतीय संघ येथे इंग्लंडविरुद्ध केवळ 124/7 धावा करू शकला.
- सर्वात मोठा विजय: 12 मार्च 2021 रोजी, इंग्लंडने भारताचा T20 सामन्यात 27 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून पराभव केला.
- सर्वाधिक धावा: येथे विराट कोहलीने 6 डावात 86 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत.
- सर्वात मोठी खेळी: या मैदानावर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने 52 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली आहे.
- सर्वाधिक षटकार: येथेही जोस बटलर पुढे आहे. बटलरने 5 डावात 10 षटकार मारले आहेत.
- सर्वाधिक बळी: हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर आहे. या वेगवान गोलंदाजाने 5 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.
- सर्वोत्तम गोलंदाजी : इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 18 मार्च 2021 रोजी झालेल्या सामन्यात भारताविरुद्ध 4 षटकात 33 धावा देऊन 4 बळी घेतले.
- सर्वात मोठी भागीदारी: 20 मार्च 2021 रोजी भारताविरुद्धच्या T20 सामन्यात जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली होती.
- सर्वाधिक सामने: भुवनेश्वर कुमार आणि विराट कोहली यांनी या मैदानावर सर्वाधिक सामने खेळले आहेत. दोन्ही खेळाडू येथे झालेल्या सर्व 6 सामन्यांचा भाग आहेत.
टॉस किती महत्त्वाचा?
आतापर्यंत येथे झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी पद्धतीने जिंकले. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :