Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
आयसीसीने महिला क्रिकेट विश्वचषकानंतर संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या निवडक खेळाडूंची बेस्ट 11 जाहीर केली आहे. पण त्यात एकाही भारतीय महिलेचं नाव नाही.
Womens World Cup 2022 : यंदाच्या महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडच्या संघाला मात देत विश्वचषक जिंकला. त्यामुळे आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या विश्वचषकातील मोस्ट व्हॅल्ययेबल संघात ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंना जागा मिळाली आहे. याशिवाय इतरही संघाच्या खेळाडूंना संधी मिळाली असून भारतीय महिला संघातील मात्र एकाही खेळाडूला यामध्ये संधी मिळालेली नाही.
आयसीसीने सोमवारी हा संघ जाहीर केला. ज्यामध्ये चार ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू, असून त्यानंतर सर्वाधिक म्हणजे तीन दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडू आहेत. तर इंग्लंडच्या दोन खेळाडू अंतिम11 मध्ये तर एख बारावी खेळाडू म्हणून आहे.
आयसीसीने जाहीर केलेला संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हीली (विकेटकीपर), राचेल हेन्स, बेथ मूनी (सर्व ऑस्ट्रेलिया); लॉरा वोल्वार्ट, मॅरिज़ान कॅप, शबनीम इस्माइल (सर्व दक्षिण आफ्रिका); सोफी एक्लेस्टोन, नेट साइवर (दोघी इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), सलमा खातून (बांग्लादेश), बारावी खेळाडू - चार्ली डीन (इंग्लंड).
ऑस्ट्रेलिया पुव्हा एकदा चॅम्पियन
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकत इंग्लडला धूळ चारली आहे. अंतिम सामन्यात या संघाने इंग्लंड संघाचा एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 71 धावांनी जिंकला. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरली. तिने 138 चेंडूत 170 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. एलिसा ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.
हे देखील वाचा-
- Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ठरला विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडचा 71 धावांनी केला पराभव
- IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला 'या' विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha