Sanju Samson : बीसीसीआयकडून तिन्ही फॉरमॅटसाठी संघ निवड करताना संजू सॅमसनकडे दुर्लक्ष, संतप्त चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
Team india : भारत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय, टी20 आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अशाप्रकारे तिन्ही फॉरमॅटमधील सामने खेळणार असून या साऱ्या सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला.
Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (13 जानेवारी) वेगवेगळ्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली. दरम्यान स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची तीनपैकी कोणत्याही फॉरमॅटमध्ये निवड झाली नाही. यामध्ये बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड केली. तिन्ही संघातून संजू सॅमसनचे नाव नाही.
संजू सॅमसन भारतीय संघात नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. संजूला संघात न निवडल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर चांगलच टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. बीसीसआयवर टीका करत संजूला टीममध्ये न घेण्याचं कारण जाणून घेण्याचा काहींनी प्रयत्न केला. तर यातील काही पोस्ट पाहूया...
Sanju samson showing angoors to the langoor selectors of BCCI pic.twitter.com/PMsreObR0l
— sudhanshu' (@whoshud) January 13, 2023
It's very tough to be fan of Sanju Samson 🙁💔#JusticeForSanjuSamson#INDvsNZ #SanjuSamson pic.twitter.com/UYoTlkqPWF
— Dinesh LiLawat (@ImDL45) January 13, 2023
No excuse for Sanju samson by BCCI
— Vikas Jakhar (@Vikas_jakhar01) January 14, 2023
Sanju again dropped. It's very tough to be fan of Sanju Samson 🙁💔. India never win world cup until these fraud selectors get sacked ..#JusticeForSanjuSamson #indvsnz #SanjuSamson @IamSanjuSamson @BCCI Shame on you pic.twitter.com/qgcHKyHyUh
Can anyone explain why has Sanju Samson been excluded from Indian squad for T20I series against New Zealand?
— RockstaR MK (@RockstarMK11) January 13, 2023
Why only he has to pay the price always?#Sanju pic.twitter.com/TH8knjDqxZ
I dont Know why Sanju Samson is not in the ODI Squad against NZ. Srikar Bharat was not in the scene and all together he has been selected ahead of Sanju Samson.
— Ritik (@themeforyou) January 13, 2023
Consistency should be there in the selection. Samson should have been there. pic.twitter.com/UyvpM906K1
Sanju Samson not picked in Indian Cricket Team Squad For NZ Series. Is he Still Injued Or Selectors again Overlooked him. pic.twitter.com/CMe0Akg4RQ
— Ayush Ranjan (@AyushRaGenius) January 13, 2023
Why always it's Sanju Samson 🥺💔@BCCI trying their best to destroy the career of a potential match winner.
— Pratham. (@74thCenturyWhxn) January 13, 2023
Now statpadding 600+ runs in IPL is the only option left for Sanju bcz BCCi don't want intent merchants in their team. They want players to statpad at 125 Strike Rate. pic.twitter.com/a8Fhyred98
संजू श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघात होता
जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत संजूला संघाचा भाग बनवण्यात आले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. मात्र, त्या सामन्यात त्याला केवळ 5 धावाच करता आल्या होत्या. यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो पुढील दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होता. विशेष म्हणजे बीसीसीआयने संजूच्या हेल्थबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे का? की त्याची निवड न करण्यामागे आणखी काही कारण आहे, त्याबाबत काहीही समोर आलेले नाही.
हे देखील वाचा-