Indore Pitch Rating : इंदूरची खेळपट्टी खराब, आयसीसीकडून रेटिंग, बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवस
Indore Pitch Rating : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी खेळलेल्या इंदूरच्या होळकर मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाले आहेत. आयसीसीने बीसीसीआयला याबाबत 14 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
![Indore Pitch Rating : इंदूरची खेळपट्टी खराब, आयसीसीकडून रेटिंग, बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवस Border Gavaskar Trophy: ICC given rating for Indore pitch after third India Australia Test know details Indore Pitch Rating : इंदूरची खेळपट्टी खराब, आयसीसीकडून रेटिंग, बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/2e48d69d48728f23344673e20eae455a1677850634332328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indore Pitch Rating : इंदूर येथील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात भारताचा नऊ विकेट्सनी पराभव झालाय. परंतु, या सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन दिवसात 31 विकेट पडल्यामुळे आयसीसीकडून देखील या मैदानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाले आहेत. आयसीसीने बीसीसीआयला याबाबत आता 14 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फारशी उत्तम नव्हती. कारण पहिल्या 30 मिनिटांत चेंडू खूप वळण घेत होता. या कसोटीच्या पहिल्या दिवशी 14 विकेट पडल्या तर दुसऱ्या दिवशी 16 फलंदाज बाद झाले. त्यामुळे भारतातील कसोटी सामन्यांसाठी तयार केलेल्या खेळपट्ट्यांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
इंदूर कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 60.3 षटकात केवळ 163 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य दिले. यादरम्यान टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. त्याने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लियॉनने बॉलसह आश्चर्यकारक कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात 8 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 3 बळी घेतले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि लेफ्ट आर्म स्पिनर मॅथ्यू कुहनेमन यांनी 1-1 विकेट घेतली.
Indore Pitch Rating : पहिल्या दिवशीच भारताचा सर्व संघ बाद
इंदूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ केवळ एकच सत्र फलंदाजी करू शकला आणि 109 धावांवर सर्वबाद झाला. त्याचदिवशी ऑस्ट्रेलियानेही आपल्या चार विकेट गमावले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 156 धावा केल्या. पण दुसऱ्या दिवशीही फलंदाज जास्त काळ टिकू शकले नाहीत. दोन्ही संघातील केवळ चेतेश्वर पुजारा आणि उस्मान ख्वाजा यांनाच अर्धशतक झळकावता आले आहे. या खेळपट्टीवर बरीच वळणे आहेत. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायनने 8 विकेट घेतल्या.
Indore Pitch Rating : पहिले दोन्ही सामने तीन दिवसात संपले
दिल्ली आणि नागपूर कसोटी सामनेही तीन-तीन दिवसांत संपले आणि आता इंदूरमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. मात्र, पहिल्याच दिवसापासून इंदूरच्या खेळपट्टीवर एक विचित्र वळण पाहायला मिळाल्याचे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Points Table : इंदूर कसोटीत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम, पाहा अपडेटेड WTC गुणतालिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)