एक्स्प्लोर
Wankhede Stadium : सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा गौरव सोहळा, सचिन तेंडुलकर ही उपस्थित
भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आज गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्तानं गावस्कर यांना वानखेडे स्टेडियमवर कायमस्वरुपी कक्ष भेट देण्यात येणार आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडचंही उद्घाटन करण्यात येणार आहे. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे, हे विशेष. गुंडाप्पा विश्वनाथ आणि सचिन तेंडुलकर या भारताच्या दोन माजी कर्णधारांची उपस्थितीही या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरावं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















