Cricket IPL 2022: आयपीएल २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ABP Majha
आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या २६ मार्च ते २९ मे या कालावधीत आयपीएलच्या मोसमाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमातल्या ७४ पैकी ७० साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची अ आणि ब अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघाच्या वाट्याला १४ सामने येणार आहेत. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.



















