Hardik Pandya : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित पर्वाचा अस्त ABP Majha
Hardik Pandya Captain: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार.. अशी चर्चा होती. पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिली आहे. 2013 पासून रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले होते. (Hardik Pandya announced as captain for the IPL 2024 season)
मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी 20 संघाची धुराही दिली जातेय.