एक्स्प्लोर
T20 World Cup: Black Live Mattersला Quinton de Kock चा विरोध,विंडीजविरुध्द सामन्यातून डी कॉकची माघार
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं विंडीजविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. आयसीसीच्या निर्देशानुसार विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याआधी दोन्ही संघांकडून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं जातं. पण डी कॉकनं मात्र असं न करता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातच विरोध दर्शवला होता. आणि याच कारणामुळे त्यानं दुसऱ्या सामन्यात खेळायचं टाळलं. दरम्यान नाणेफेकीवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमानं व्यक्तिगत कारणामुळे डी कॉक खेळत नसल्याचं म्हटलं होतं. पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं याबाबत सविस्तर पत्रक जाहीर केलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















