एक्स्प्लोर
T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेन्टी20 विश्वचषकातून 'आऊट'?
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 8 विकेट्सनी लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. भारतानं दिलेलं 111 धावांचं माफक आव्हान किवी फलंदाजांनी पंधराव्या षटकातच पार केलं. पाकिस्तानपाठोपाठ याही सामन्यात भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरली. चौथ्या षटकात बुमरानं गप्टिलला माघारी धाडलं. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीच्या डॅरी मिशेलनं 72 धावांची भागीदारी साकारली. बुमराच्याच गोलंदाजीवर मिशेल 49 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विल्यमसननं डेवॉन कॉनवेच्या साथीने विजयाचं सोपस्कार पूर्ण केले. विल्यमसननं नाबाद 33 धावांची खेळी केली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion
















