IND vs SA Women : थरारक लढतीत आफ्रिकेची बाजी, भारतीय महिला संघाचा पराभव ABP Majha
ICC World Cup IND W vs SA W: महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. आफ्रिकेनं भारतीय महिला संघाचा तीन विकेटनी पराभव केला. भारताने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेपुढे 275 धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आफ्रिकेच्या संघानं शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचचा थरार पाहायला मिळाला. अखेर चुरशीच्या लढतीत आफ्रिकेनं बाजी मारली.
आफ्रिकेकडून लौरा वोल्वार्टने चांगली फलंदाजी केली. तिने 80 धावांची दमदार खेळी केली. तसेच आफ्रिकेच्या मिग्नॉन डू प्रीजची 52 धावांची दमदार खेळी केली. दरम्यान, या पराभवामुळं भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हानं संपुष्टात आले आहे. जर इग्लंड आजची मॅच हरला तर आणि भारत जिंकला असता तर भारताला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी होती.























