(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kapil Dev on Team India Victory Parade : रोहित,बुमराह ते सूर्या ते द्रविड;कपिल देव यांच्याकडून कौतुक
Kapil Dev on Team India Victory Parade : रोहित,बुमराह ते सूर्या ते द्रविड;कपिल देव यांच्याकडून कौतुक
मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमले
टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय...रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.
Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोला पथक सज्ज
Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे.
Team India Celebration: वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी
Team India Celebration: वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल स्थानिक पोलीस असा बंदोबस्त करण्यात आला.