एक्स्प्लोर
India vs Australia 3rd Test | सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सात जानेवारी रोजी सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कसोटी मालिकेत सध्या दोन संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडिया आज मेलबर्नहून सिडनीसाठी रवाना होणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















