ICC T20 World Cup 2021 : Australia vs Sri Lanka कोण राहणार सेमीच्या शर्यतीत ABP Majha
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पहिल्या गटात आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन बलाढ्य संघांमधला सामना खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी या गटात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळं उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्थान कायम राखण्याच्या दृष्टीनं दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवायचं, तर श्रीलंकेची मदार प्रामुख्यानं महिश तिक्षनाच्या फिरकीवर राहिल. या विश्वचषकाच्या पात्रता फेरीत तिक्षनानं आठ विकेट्स काढून श्रीलंकेच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता. पण तोच तिक्षना पाठदुखीमुळं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. पण दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला महिश तिक्षनाकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहिल.























