World Water Day : Dhanuka ची साथ, पाणी बचतीसाठी मदतीचा हात, जलदिन विशेष, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा
World Water Day : Dhanuka ची साथ, पाणी बचतीसाठी मदतीचा हात, जलदिन विशेष, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा
आपल्या पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यापैकी 97 टक्के समुद्र आणि महासागरांमध्ये आहे जे खारट आहे आणि जे पिण्यासाठी वापरता येत नाही… फक्त 3 टक्के पाणी पिण्यासाठी योग्य आहे आणि त्यातही 2.4 टक्के हिमनद्यामध्ये आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये आहे. फक्त 0.6 टक्के पाणी नद्या, तलावांमध्ये आहे ज्याचा पिण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर ताज्या पाण्याची मागणी देखील वाढतेय, पावसाची अनियमितता वाढत आहे, हवामानातले बदल ही एक मोठी समस्या बनत चालली आहे… आणि या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग आणि त्यात होणारी वाढ, आपल्या गरजांसाठी झाडे तोडणे असो वा पर्वत तोडणे असो, औद्योगिकीकरणामुळे होणारे प्रदूषण असो, वाहनांच्या आवाजापासून ते लाऊडस्पीकरच्या आवाजापर्यंत असो, माणूस आपल्या सोयीनुसार आरामासाठी निसर्गाला मागे सोडत चाललाय, त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललाय.