एक्स्प्लोर
Washim : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार, अनेक विकासकामांचं भूमिपूजन होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिमच्या पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आठ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकारने ५९३ कोटींचा निधी मंजूर केला असून, याच विकासकामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणारेय. त्याचप्रमाणे १५१ फुटांच्या सेवाध्वजाचीही स्थापना याठिकाणी होणारेय. दरम्यान, बंजारा समाजाचे प्रतिक असलेल्या नंगारा भवनसमोर संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या पुतळ्याचही अनावरण करण्यात येणारेय.
आणखी पाहा























