Mangalvedha Ganesh Temple : पुरातत्वविभागाकडून बाप्पांच्या आगमानवेळीच मंदिरात तोडफोड; ग्रामस्थ नाराज
आज बाप्पाच्या आगमनाचे राज्यभर स्वागत होत असताना मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. मंदिरातील तोडफोडीनंचक भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.. गावकऱ्यांनी तातडीने पुरातत्व विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे . मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलीय. पुरातत्व विभागाच्या नियमाचा जरी भंग झाला असला तरी किमान तोडफोड करण्यापूर्वी गणेशचतुर्थीला अशी कारवाई करणे कितपत योग्य होते असा सवाल आता ग्रामस्थ आणि भाविक करीत आहेत .





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
