Sindhudurg Tree Cutting : सिंधुदुर्गात बेसुमार वृक्षतोड, परिसरातील एक हजार झाडांची कत्तल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग जैवविविधतेने संपन्न अश्या भागात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या क्षेत्रातील जमिनीत मोठया प्रमाणात बेकायेशीररित्या वृक्ष तोड करण्यात आली आहे. वनविभागाकडून पाल,
पाट्ये गावातील हद्दीत झालेल्या या बेकायदा वृक्षतोडीची पाहणी व पंचनामा करण्यात आला. या परिसरातील हजारो झाडे तोडण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तिलारी धरण परिसरातील क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी शेती बागायती केली असून बहुतांश जमिनी मोठ्या प्रमाणात व्यवसायिकांनी खरेदी केल्या आहेत. या क्षेत्रातील काही जमीनीत मोठया व्यवसायिकांनी दलालामार्फत बेकायदा वृक्ष तोड केली असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करत आहेत. आता वनविभाग त्याच्या पर्यंत पोहचते की अज्ञाताकडून वृक्षतोड असे दाखवून प्रकरण फाईल बंद करते हे पाहाव लागणार आहे.























