एक्स्प्लोर

Kisan Morcha : शरद पवारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोर्चात सहभागी होणार

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.

मुंबईमध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आता शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला आहे.

किसान मार्च भिवंडी दाखल; जेवण करून शेतकरी मुंबईकडे रवाना

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात करण्यात आली आहे. हा मोर्चा आता भिवंडीत दाखल झाला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे आता सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन यापेक्षाही चारपट मोठं असेल असा इशारा देखील देण्यात आला आहे तर येणाऱ्या 26 तारखेला जवळपास दहा लाख शेतकरी आंदोलन करणार असल्याचं देखील संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांचा विराट मोर्चा लवकरचं मुंबईत धडकणार! पाहा निवडक छायाचित्रं

कृषी कायद्याच्या विरोधात नाशिकहुन निघालेला किसान मोर्चा भिवंडीत दाखल झाला असून 10 हजार शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था अमृत वेला संस्थेच्या वतीने करण्यात आली. शेतकरी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Kisan Sabha Morcha | किसान सभेचा मोर्चा भिवंडीत दाखल

बातम्या व्हिडीओ

Latur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?
Latur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
Jawaharlal Nehru : बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या  'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या 'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP MajhaLatur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
Jawaharlal Nehru : बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या  'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या 'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27  मे  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2025 | मंगळवार
माझ्या भावाला पोलिसांनी सुपारी घेऊन मारलं, आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप, वाळूजच्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
माझ्या भावाला पोलिसांनी सुपारी घेऊन मारलं, आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप, वाळूजच्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
Nashik Jindal Company Fire : नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ
नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ
ITR Filing Extension : मोठी बातमी, आयटीआर फायलिंगला दीड महिना मुदतवाढ, सीबीडीटीचा मोठा निर्णय, कारण समोर 
मोठी बातमी, आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, सीबीडीटीचा मोठा निर्णय, कारण समोर 
Embed widget