(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara : साताऱ्यातील मांढरदेवी गड भक्तांनी फुलला, नवरात्रोत्सवानिमित्त काळूबाईच्या दर्शनसाठी गर्दी
Navratri 2022 : हिंदू पंचागानुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी (Ghatstahapana) आज (26 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीचे (Devi Shailpiutri) पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. नवरात्रोत्सवानिमित्त साताऱ्यातील मांढरदेवी गडही भक्तांनी फुलून गेलाय... नवरात्रोत्सवानिमित्त मांढरदेवी गडावरील काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालीय.. राज्यासह कर्नाटकातील भाविक गडावर पोहोचलेत... सकाळी मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीची पूजाअर्चा करत आरती केली.. नऊ दिवसाच्या कालावधीत गडावर येणाऱ्या भाविकांना देवीचे विविध नऊ रूपं पाहायला मिळतात.. नवरात्रोत्सवानिमित्त काळूबाईच्या संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.