Girish Mahajan Satara : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या भेटीला
Girish Mahajan Satara : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या भेटीला
भाजपचे नेते गिरीश महाजन हे उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी पोहोचले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात असलं तरी या भेटीमागचं राजकारण मात्र वेगळं आहे. उदयराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र साताऱ्यासाठी अद्याप उमेदवारी जारी झालेली नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी भाजपला संकेत देऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत असा संदेश दिला होता. उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी शांत राहावं यासाठीचा वेगळा फार्म्युला देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन गिरीश महाजन घेऊन आल्याचं समजतं. हा फॉर्म्युला नेमका काय हे गिरीश महाजन किंवा उदयनराजेच सांगू शकतील. परंतु उदयनराजे सहमत होतीलच असं नाही. लोकसभा लढवण्यावर उदयनराजे ठाम आहेत. भाजपने जर उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर ते इतर पक्षाकडेही वळू शकतील, असं सध्याचं चित्र दिसत आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
