Pune : शांतिश्री पंडित यांच्या JNU कुलगुरुपदी नियुक्तीची योग्यता तपासण्याची मागणी, काय आहे प्रकरण?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित-डुलीपुडी यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नियुक्ती झालीय. त्यांच्या या नियुक्तीवरून वाद निर्माण झालाय. कारण शांतिश्री पंडित यांची पुणे विद्यापीठातील कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यामुळे पंडित यांच्या नियुक्तीची योग्यता केंद्र सरकारनं तपासून पाहावी यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहेत. शांतिश्री पंडित यांनी आंतराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या संचालक असताना घेतलेल्या निर्णयांची चौकशी दक्षता समितीकडून केली होती. प्रवेश प्रक्रियेत घोटाळा केल्याचा ठपका समितीनं ठेवला आहे.























