Pune Drugs : पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, 5 जण ताब्यात, हॉटेल सील
Pune Drugs : पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, 5 जण ताब्यात, हॉटेल सील पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स (Pune Drugs) पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. सदर प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीस करणार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. याचदरम्यान पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात- नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 मध्ये 155 गुन्हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह बाकी पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस अॅक्टअंतर्गत 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 155 गुन्हे दाखल झाले आहेत. यात 215 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)