एक्स्प्लोर

Pooja Chavan Suicide | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता

पुणे : पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली होती. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावं असं म्हटलंय. त्यामुळं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.

पूजाने ज्या वानवडी भागात आत्महत्या केली त्या भागातील स्थानिक भाजप नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय. सोशल मीडियावर राज्य सरकारमधील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात घेतलं जात असल्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा सोखमोक्ष लावण्याची गरज असल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

पूजा चव्हाण आणि तिच्या मित्राचे जसे राज्य सरकार मधील मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आहेत तसेच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबत देखील फोटो आहेत. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय. परंतु, पूजाच्या आई-वडिलांनी अजूनपर्यंत गप्प राहणंच पसंत केलय. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्ह दिसू लागल्यानं पुणे पोलिसांनी स्वतः या प्रकणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
NEET Result : तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी
तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं

व्हिडीओ

Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget