IT Raid on Avinash Bhosle | बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या संपत्तीवर आयकर विभागाची धाड
पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे केंद्रीय तपास यंत्रणांकडून सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील ए बी आय एल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी आलेले सुरक्षा रक्षक दिसून येतायत. मात्र स्वतः अविनाश भोसले मात्र आज पुण्यात नाहीत. काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावलं होतं. अविनाश भोसले हे जलसंपदा विभागातील कॉन्ट्रॅक्टस, बांधकाम, इन्फ्रा याच्याशी संबोधीत आहेत आणि बांधकाम अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे जवळचे संबंध लिहिलेत. राज्य मंत्री विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.























