Pune Ganeshotsav: दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी, गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा
पुण्याचे जसे मानाचे 5 गणपती आहेत तसाच एक प्रसिद्ध गणपती म्हणजे दगडूशेठ गणपती. याच दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. गणेश भक्तांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना,भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.























