Harshvardhan Patil on Mahayuti : तुतारी हाती घेणार का? हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेली दोन महिने झाले मतदारसंघात फिरत आहे. मी विधानसभा लढवली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. काहीजण म्हणतात अपक्ष लढा, तर काहीजण म्हणतात 'तुतारी' हातात घ्या. पुढील काही दिवसांत जनतेत जाऊन मते जाणून घेणार आहे. महायुतीचा कोणताही निर्णय तीन नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे. मागील आठवड्यात इंदापुरात शासकीय कार्यक्रम पार पडला. तेव्हा, आम्हाला बोलावण्यात आलं नाही."
"आम्ही महायुतीचाच घटक आहोत ना? अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? हे आमच्या नेत्यांना विचारणार आहे. कुणीही आमच्याशी बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे. पण, त्याआधी जनतेशी संवाद साधणार आहे," असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सांगितलं आहे.
"विधानसभा आली की आमचं काय चुकतं? त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. याचा विचार नेतृत्वानं करावा. भाजप आणि महायुतीतील कुठल्याच नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही. महायुतीत नेत्यांना माझी काय अडचण असेल, तर सांगावं. मी भाजपमध्ये काही मागण्यासाठी गेलो होतो. माझा जो वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्याचा उपयोग नेत्यांनी करून घ्यायला पाहिजे होता. प्रत्येक जणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे अद्याप पर्यंत कोणताही मी निर्णय घेतला नाही," असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी स्पष्ट केलं.
"लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. नाहीतर नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला होते. लोकसभेला आपण बघितला आहे काय होतं. आम्ही सगळे नेते एका बाजूला होतो आणि जनता एका बाजूला काय झाली. पण, पाहिलं माझा विश्वास जनतेवर आहे जनतेचा काय आवाज आहे हे बघितल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ," असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.