Ayodhya Ram Mandir :बाबरी मशिद पाडली तेव्हा प्रभू रामांची मूर्ती कुठे होती?पुणेकर जोशींचं काय योगदान?
कारसेवक किंवा कारसेवा हा संस्कृत शब्द आहे. पण सध्या हा फक्त एक शब्द नाहीय तर ही भावना आहे. अनेक कारसेवकांच्या सेवेमुळे बाबरीचा ढाचा पडला.. ९२ साली जेव्हा ढाचा पाडण्यात आला.. त्यावेळी तिथे एक रामाची मूर्ती होती. तिथं असलेल्या राम मूर्तीचं काय झालं? त्याचं रक्षण कुणी केलं असे अनेक प्रश्न पडतात.. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. पुण्याचे तेव्हाचे विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष असलेले माधवराव जोशी यांनी रामाची मूर्ती सांभाळली. आज ते हयात नाहीत मात्र त्यांच्या बरोबर तेव्हाचे बजरंग दलाचे शहर संयोजक शरदराव गंजिवाले यांनी तो अनुभव घेतलाय. हा अनुभव त्यांनी सांगितलाय. तर माधवराव जोशी यांची मुलगी धरित्री जोशी यांनीही त्यावेळचा प्रसंग सांगितला पाहूया.























